VIDEO: 'पुण्यातच नाही तर जळगावमध्येही ड्रग्सचे पेव', Gulabarao Patil यांच मोठं विधान
पुणे: ड्रग्स प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ड्रग्सचा पेव हा पुण्या मध्येच नाही तर जळगाव मध्ये देखील आहे असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ड्रग्स प्रकरणात जे सापडत असतील त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक स्वतंत्र आणि वेगळा कायदा केला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. हे जे विष आहे ते संपूर्ण देशामध्ये पसरत आहे. त्याच्या विरोधात कडक धोरण व्हावं. अशी मागणी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. ड्रग्स प्रकरणात यात कडक कायदा झाला पाहिजे, हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.तरुण पिढीला बरबाद करत आहे. भारताचा भविष्य खराब करणारा आहे. त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. मी सुद्धा यामध्ये लक्ष देणार आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.