गणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

Mumbai-Goa highway toll waiver announced for Ganeshotsav : गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा हायवेवरून जाणाऱ्या गणेशभक्तांना बाप्पा पावलाय. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात वाहनांना आणि एसटी बसना टोलमाफी मिळणार आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद भाविक मनोभावे निरोप देताना दरवर्षी घालत असतात. भक्तांच्या या हाकेला बाप्पानं होकार दिला असून, यंदा लाडक्या बाप्पाचं लवकर आगमन होणार आहे. मुंबई आणि उपनगरांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. दरवर्षी या गणेशभक्तांना मुंबई-गोवा हायवेवरच्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यातल्या त्यात दिलासा म्हणून सरकारकडून या हायवेवरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी दिली जाते. यंदाही सरकारनं या गणेशभक्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोल वसूल केला जाणार नाही. या रस्त्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना आणि एसटी महामंडळाच्या बसना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com