Nashik Rain: निफाडमध्ये निसर्गाचा तांडव! ढगफुटीसदृश पाऊस, वीजांचा गडगडाट आणि गारपीटीने थैमान|VIDEO

Severe Weather in Niphad: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अचानक आज ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आणि काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा देखील पडला.

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास मौजे कसबे-सुकेणे परिसरात ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. अवघ्या काही मिनिटांत रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.जोरदार पावसाच्या आधी काही भागांमध्ये गारपिटीचाही अनुभव आला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः नुकत्याच लागवड केलेल्या नवीन वेलींना याचा मोठा तडाखा बसला आहे.या पावसामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असून सरकारकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com