Video: वैभव नाईकांबाबतच्या ट्विटवर निलेश राणेंचं स्पष्टीकरण!

हा मोठ्या षडयंत्राचा एक भाग आहे. पन्नास टक्केच माझ्या कानावर आलं आहे. हे आपण का करतो आहे ते फक्त एका विजयासाठी निवडणुका जवळ आल्या आहेत त्याच्यासाठी हे करतो आहे का?

मालवण राजकोट किल्ल्यावरील दुर्घटना घडली त्यावेळी लगेचच आमदार वैभव नाईक कसे पोहोचले असा सवाल करणारे ट्विट माजी खासदार निलेश राणे यांनी केले होते यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची वैभव नाईक यांनी तोडफोड केली त्यावेळी मी वैभव नाईक यांची बाजू घेतली होती पण मला काल जे काही फोन आले आणि जी माहिती मला मिळाली ती अतिशय धक्कादायक आहे. देव करो ते सगळं खोटे निघावं. वैभव नाईक तर सोडाच त्यांचं कुटुंब देखील महाराष्ट्रात राहणार नाही आठवड्याभरात हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल आणि ते जर खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नाईक यांच्यासाठी. हा मोठ्या षडयंत्राचा एक भाग आहे. पन्नास टक्केच माझ्या कानावर आलं आहे. हे आपण का करतो आहे ते फक्त एका विजयासाठी निवडणुका जवळ आल्या आहेत त्याच्यासाठी हे करतो आहे का? मी सर्व पुराव्यानिशी हे तुमच्या समोर आणणार. हे षडयंत्र कसं घडलं कुठल्या वेळेला घडलं त्यांच्याच माणूस कसा फुटला. कधीपासून हे टप्प्याटप्प्याने घडवत गेले 1 वाजून 18 मिनिटांनी पुतळा कोसळताना पाहिला तो हवेमुळे कोसळला की काही कालावधीपासून एक वेगळा षडयंत्र त्याच्यामागे होतं लवकरच मी तुमच्यासमोर ठेवीन असं माझी खासदार निलेश राणे यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com