Ahmednagar News: निलेश लंकेंच्या PAला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट!

Ahmednagar News Today: नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचे खाजगी स्विय सहायक राहुल झावरे हे काही लोकांच्या घरी जाऊन निलेश लंके यांचे निवडणुकीत काम का केले नाही?, याचा जाब विचारताना व्हिडिओ आता समोर आला आहे.

नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्या मारहाणी प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दहा ते बारा जणांवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पारनेरचे माजी नगर अध्यक्ष विखे समर्थक विजय औटी यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता प्रकरणात नवीन वळण लागले असून नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचे खाजगी स्विय सहायक राहुल झावरे हे काही लोकांच्या घरी जाऊन निलेश लंके यांचे निवडणुकीत काम का केले नाही?, याचा जाब विचारताना व्हिडिओ आता समोर आला आहे. राहुल झावरे मारहाण प्रकरणात ज्या प्रितेश पानबंद यांना अटक झाली आहे. त्यांच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन राहुल झावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल झावरे हे आमच्या घरी येऊन हर्षदा पानबंद यांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षदा पानबंद यांनी केला आहे. त्यामुळे पुढील प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com