History Book : शालेय पुस्तकात आता मुघलांच्या क्रुरतेचे धडे | VIDEO

NCERT textbook changes : एनसीईआरटीने आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकाता महत्वाचे बदल केले आहेत.शालेय पुस्तकात आता मुघलांच्या क्रुरतेचे धडे शिकवले जाणार आहेत.

एनसीईआरटीने आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोठे बदल केले असून, आता विद्यार्थ्यांना मुघल साम्राज्याच्या क्रूरतेचे धडे शिकवले जाणार आहेत. नव्या पुस्तकात बाबरला "निर्मम आणि क्रूर विजेता" तर औरंगजेबला "धार्मिक कट्टरपंथी" शासक म्हणून दाखवण्यात आले आहे. याआधी या शासकांची ओळख अनुक्रमे साम्राज्य स्थापक आणि उदारमतवादी शासक अशी होती. या नव्या पाठ्यपुस्तकात अकबरच्या कारकिर्दीकडेही समतोल दृष्टिकोनातून पाहण्यात आलं आहे. चित्तौडच्या लढाईनंतर हजारो निष्पाप लोकांचा संहार आणि त्याचवेळी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण हे दोन्ही पैलू समोर ठेवले आहेत.या निर्णयामुळे शालेय अभ्यासक्रम अधिक व्यापक आणि वास्तववादी होणार असल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com