Ajit Pawar VIDEO: राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते घेणार सिद्धीविनायक मंदिरात दर्शन

Ajit Pawar At Siddhivinayak Temple: अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आज सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणार आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा अध्याय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते आज सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी सगळेच बाप्पाच दर्शन घेण्यासाठी सिद्धीविनायक मंदिरात येणारआहेत. १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचं दर्शन घेऊन राष्ट्रवादीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीचे नेते घेणार बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्या नेत्यांसाठी पक्ष कार्यालयात बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामार्फत सर्व नेते, पदाधिकारी मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com