Nashik Nylon Manja Accident : लग्नापूर्वीच मांजाने कापली आयुष्याची दोरी; नायलॉन मांजामुळे तरुणाचा मृत्यू

Nylon Manja Accident : मकर संक्रांतीनिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी केलेली पतंगबाजी नायलॉन मांजामुळे जीवघेणी ठरलीय.. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एक महिन्यावर लग्न असलेल्या तरुणाचा जीव गेलाय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Nylon Manja
Nylon Manja news Saam tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

मकर संक्रांतीला अनेकजण पतंग उडवून आनंद साजरा करतात.. मात्र याच पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा नाशिकमध्ये सोनू धोत्रे नावाच्या 23 वर्षीय तरुणाच तरुणाच्या जीवावर उठला... नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर भागातून सोनू धोत्रे जात असताना पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला आणि सोनूचा गळा चिरला गेला.त्यानंतर सोनू धोत्रेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.. मात्र डॉक्टरांनी सोनूला मृत घोषित केलं आणि धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.. मे महिन्यात सोनूचं लग्न होतं. त्याआधीच मांजानं त्याचा जीव घेतल्यानं त्याच्या बहीणीने टाहो फोडलाय.

Nylon Manja
Nylon Manja : नायलॉन मांजामुळे PSI चा गळा चिरला, रक्तस्राव होऊन जागेवरच बेशुद्ध

नाशिकच्या लासलगावमध्येच अशा एका तरुणाला मांजामुळे तब्बल 41 टाके पडले आहेत...तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही नायलॉन मांजाने ड्युटीवर निघालेल्या पीएसआय दीपक पारधेंचा गळा चिरला गेलाय..पारधेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय.. मांजामुळे बळी जाण्याची ही काही पहिली घटना नाही. दरवर्षी राज्यात मांजामुळे अनेकांचा मृत्यू होतो.

Nylon Manja
Nylon Manja: घातकी मांजा! मजुराचा मांजाने कापला गळा, गळ्यावर पडले २२ टाके

यंदाही मांजा अनेकांच्या जीवावर उठला. कोणत्या जिल्ह्यात किती जणांचा बळी गेलाय ते पाहूयात...

नायलॉन मांजाचे बळी

नाशिक- 2 मृत्यू, 17 जखमी

मुंबई

2 मृत्यू, 4 जखमी

भंडारा

1 मृत्यू

छत्रपती संभाजीनगर

52 जखमी

नागपूर

40 जखमी

Nylon Manja
Nylon Manja Death: नायलॉन मांजानं कुणाचा बळी, तर कुणाचा चिरळा गळा, कुणाला ४५ टाके; संक्रांतीच्या दिवशीच राज्यात दुर्दैवी घटना

मकर संक्रांतीला पतंगबाजीचा आनंद लुटला जातो... मात्र हा आनंद लुटण्यासाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेक कुटुंबांना उध्वस्त करून त्यांचा आनंद हिरावतोय...नायलॉन मांजामुळे अनेक प्राणी आणि पक्षांचाही बळी जातो...त्यामुळे बंदी असतानाही नायल़ॉन मांजाची सर्रास विक्री आणि त्याचा वापर कसा होतो? हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी हा मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com