Manasvi Choudhary
नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्राती आहे.
मकर संक्रांतीनिमित्त विविध गोड पदार्थाचे नैवेद्य घरी केले जाते.
यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा होणार आहे.
तीळ शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरते.
गुळ पोळी बनवताना अंदाजानुसार तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस, एका कढईत भाजून घ्या.
नंतर गॅसवर कढईत तेलामध्ये बेस पीठ घाला आणि परतून घ्या.
परतून घेतलेले बेसन पीठ आणि तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.
संपूर्ण मिश्रणात जायफळ पावडर, वेलची पावडर, किसलेला गूळ घाला.
आता पोळीसाठी मैद्याचे पीठ तयार करा. यामध्ये तूप आणि मीठ घाला.
मैद्याच्या पोळीत तयार सारण भरा नंतर पोळी लाटा आणि खरपूस भाजून घ्या.
अशाप्रकारे मकर संक्रांत स्पेशल गुळपोळी खाण्यासाठी तयार आहे.