गुन्हेगारी स्टाईल रिल्स करणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी उतरवला माज|VIDEO

Nashik Police Arrest Reel Stars: नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी स्टाईल रील्स तयार करणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली. शहरातील भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या व्हायरल रील्सवर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असल्याचा संदेश दिला.

नाशिकमध्ये खूनसत्र सुरूच असून एकामागे एक खून दरोरोजच घडत आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच पोलिसांनी आता खाकीचा धाक दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांची धिंड काढली होती आणि या शहरात फक्त एकच राजा... 'कायदा' अशी रील सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पाठोपाठ काही टवाळखोरांनी गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा अशी रील्स तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते.

मात्र काही वेळातच या टवाळखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि पोलिस ठाण्यात आणून त्यांचा माज उतरवला. यानंतर या रील स्टार भाईने आपला माफीनामा दिला. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, कायद्याचा बालेकिल्ला नाशिकजिल्हा.

सोशल मीडियावर जर कोणी अशा प्रकारे रिल्स तयार करून दहशत पसरवण्याचे प्रयत्न करणार असेल तर त्याच्या नांग्या ठेचल्या जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com