Nashik News: चालत्या वाहनावर अचानक झाड कोसळलं, केबिनचा अक्षरश: चुरा | VIDEO

Massive Tree Falls on Moving Tempo in Nashik: नाशिकच्या गडकरी चौकात वाळलेले झाड टेम्पोवर कोसळल्याने चालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शहरातील वाळलेल्या झाडांच्या धोकादायक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक येथील नेहमीच वर्दळ असणाऱ्या गडकरी चौकात टेम्पोवर मोठे वाळलेले झाड पडल्याची घटना घडली. झाड कोसळल्याने टेम्पो चालक हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी नागरिकांनी तातडीने टेम्पोचा दरवाजा तोडला आणि चालकाला बाहेर काढला. यामुळे तो थोडक्यात बचावला आणि त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडकरी चौकाकडून चांडक सर्कलकडे हा जाणारा रस्ता आहे. या भागात सर्व शासकीय बंगले आहे. तसेच या परिसरात अनेक मोठ मोठे झाडे असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाढलेल्या झाडांची छाटणी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. या अपघातामुळे काहीवेळ वाहतूक ही विस्कळीत झाली होती. तर क्रेनच्या सहाय्याने झाडाला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील जुन्या वाळलेल्या झाडांचा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आता तरी नाशिक महापलिकेला जाग येणार का? हा प्रश्न कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com