VIDEO : जरांगेंविरोधात लिहिली पोस्ट; नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक

Nashik News : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधात अवमान करणारी पोस्ट लिहिणाऱ्या डॉक्टरविरोधात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पोस्ट लिहिली म्हणून नाशिक येथील एका डॉक्टरवर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरवर शाई ओतली आहे. डॉ. विजय गवळी असे या डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. विजय गवळी यांनी मनोज जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. तसेच आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही, मात्र आमच्या भावना तीव्र असून जगण्या-मरण्याची लढाई आम्ही लढत आहोत, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी डॉ. विजय गवळी यांना म्हंटल आहे. तर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्यावर डॉ. गवळी यांनी माफी मागितली असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ''मीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझ्याकडून चूक झाली असून त्यासाठी क्षमस्व. माझ्याकडून अनावधानाने मनोज जरांगे पाटील यांचा अवमान करणारी पोस्ट पाठवली गेली आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.'' असं डॉ. विजय गवळी यांनी या व्हिडिओमध्ये म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com