Video: "सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे", नरेश म्हस्केंचं वक्तव्य
आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना निधी बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल असं नरेश म्हस्के म्हणालेत. चुकीची माहिती देऊन काही अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला असेल. सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे असंही ते म्हणालेत. अजूनही काही अधिकारी महाविकास आघाडीच्या काळापासून नोकरी इकडे करत असून चाकरी तिकडे करत आहेत त्यांनी असा निर्णय घेतला असेल. अजित पवार यांचं बहिणीवर जास्त प्रेम आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी जाहिरातीत नाव टाकलं नसेल असंही नरेश म्हस्के म्हणालेत. ज्या सांगलीत काँग्रेसने अपक्ष उमेदवार उभा केला त्याच सांगलीत राहुल गांधी उध्दव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून द्यायला येत आहेत. शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री पदाच्या बाबत केलेलं विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांना दिलेली चपराक आहे असंही नरेश म्हस्के म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.