Narendra Modi Oath Ceremony: शपथविधीवेळी राष्ट्रपती भवन परिसरात आलेला 'तो' प्राणी बिबट्या?

Narendra Modi Oath Ceremony News Today: शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक मित्रराष्ट्रांचे प्रमुख, देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, सेलिब्रेटींसह तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला एक निमंत्रण नसलेला पाहुणादेखील आला होता. तो राष्ट्रपती भवन परिसरात आढळून आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएतील एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक मित्रराष्ट्रांचे प्रमुख, देशभरातील वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, सेलिब्रेटींसह तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला एक निमंत्रण नसलेला पाहुणादेखील आला होता. या पाहुण्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. काही समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा बिबट्या होता. मात्र हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे हा बिबट्याच होता असा दावा करता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com