Nandurbar Accident: भीषण अपघात; कठडा तोडून ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला

Nandurbar Truck Accident: स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं संरक्षण भिंत तोडून ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला.
Nandurbar Accident
Nandurbar Truck Accidentsaam Tv
Published On

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील धडगाव घाटात एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात झालाय. अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळलाय. अपघातात सुदैवानं कोणतीच जीवितहानी झाली नाही. पण लहान मुलांच्या पोषण आहाराचं मोठ नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं संरक्षण भिंत तोडून ट्रक थेट १०० फूट खोल दरीत कोसळला.

मुंबई - गोवा महामार्गावर गँस टँकर पलटी

महामार्गावर निवळी घाटात सीएनजी टँकर पलटी झालाय.

जयगडवरुन मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर पलटी झाला. महामार्गाच्या कडेला टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com