VIDEO: नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, नागरिकांची दाणादाण

Nandurbar Rain Flood Like Situation In Navapur: नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. यामुळे नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे.

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.नवापूर तालुक्यात पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नवागाव परिसरात नेसून नदीचे पुराचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे. नवागाव येथील आश्रम शाळेच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे, तरी विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय. नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन मदत केलीय. तर कोलदा ते चिचपाडा दरम्यान मुसळधार झालेला पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.

सध्या पाऊस ओसरला असला, तरी सकल भागात पाणी साचल्याचं समोर येतंय. नाले देखील ओसंडून वाहत आहेत, तर घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. अगदी जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. तर प्रशासन आमचे म्हणणे ऐकत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पुरामुळे झालेली नुकसान कोण भरून देणार? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com