Nandurbar Flood : सातपुड्यात नदीला पूर, 12 गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Son River Overflows, 12 Villages Cut Off in Nandurbar Due to Flooding : नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आला आहे. सोन नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अक्राणी तालुक्यातील सोन गावाजवळील परिसरात असलेल्या नदीला पूर आला आहे. परिणामी, १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नागरिकांना एक गाव सोडून दुसऱ्या गावात जाणं कठीण झालं आहे.

पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झालं असून, पूरग्रस्त भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापक पथकाला अर्लट करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील काही तास पाऊस सुरूच राहण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com