Nagpur Rain: नागपूरला मुसळधार पावसाचा तडाखा; शाळांना सुट्टी, जनजीवन विस्कळीत|VIDEO

Nagpur district rainfall in last 24 hours : नागपूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू आहे. २४ तासांत १७२.२ मिमी पावसाची नोंद. नक्षी नदीला पूर आल्याने शाळांना सुट्टी जाहीर; काही रस्ते बंद. प्रशासनाकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन.

उपराजधानी नागपूरमध्ये पावसाने गेल्या तीन दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस दोन दिवस उलटून गेल्यावरही थांबलेला नाही. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या 24 तासांत नागपुरात 172.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या स्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना मंगळवारी (9 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे.

संततधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नक्षी नदीला पूर आला आहे. परिणामी भिवापूर - जवळी - हिंगणघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीचं पाणी शेजारच्या परिसरात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे रविवारीपर्यंत या भागात सरासरीच्या तुलनेत 40 टक्क्यांची पावसाची कमतरता होती. मात्र सलग पावसामुळे बॅकलॉग भरून काढला गेला आहे.

सध्या प्रशासन सतर्क असून संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com