धक्कादायक! लग्नाला फक्त १४ महिने; २१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या|VIDEO

Nagpur Horror: नागपूरच्या टाकळघाट येथे २१ वर्षीय चैताली कामडी हिचा मृतदेह आढळून आला. तिच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला असून पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये एका 21 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले आहे.मात्र तिच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगत सासरच्यावर गंभीर आरोप लावले आहे.

ही घटना नागपुर जिल्ह्यातील टाकळघाट या गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर येथील टाळगावमध्ये एका २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप मृतक विवाहितेच्या वडिलाने केला आहे. आरोपी मृतक विवाहितेचा पती आणि त्याच्या आईला कठोर शिक्षा करावी अशी मागणी मुलीचे वडील रामदास मेघरे यांनी केली आहे.

चैताली मनोज कामडी असे मृतक विवाहितेचे नाव आहे. टाकळघाट येथे 17 तारखेला तिने गळफास लावून आत्महत्या केली. यात तिने आत्महत्या नाही तर हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केलाय. या प्रकरणी हुंडाबळी यासह विविध कलमन्वे गुन्हा दाखल करत बुट्टीबोरी पोलिसानी मनोज कामडीच्या मुसक्या आवळल्या आहे. यामध्ये सासू रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी दिली.

चैतालीच्या लग्नास फक्त १४ महिने झाले होते. या दरम्यान सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. शिवाय मुलं बाळ होत नसल्याचा त्रास दिला जात होता. त्रास सहन न झाल्याने तिने एवढा टोकाचा निर्णय घेतला. असा आरोपी वडील रामदास मेघरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com