Video: नागपूर खंडपीठाने MSRDC ला फटकारलं, आकडेवारीसह कागदपत्र सागर करण्याचे आदेश

सामाजिक कार्यक्रते अनिल वाडपल्लीवर यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने MSRDC ला सुनावले.

समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने MSRDC ला फटकारले. समृद्धीच्या एन्ट्री पॉईंटवर तपासणी होत असल्याची खोटी माहिती सादर केल्याचं निदर्शसनास आल्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले. तुम्हाला कसे हाताळायचे आम्हाला चांगले ठाऊक असल्याच म्हणत न्यायालयाने खडे बोल सुनावलेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नियमित वाहन तपासणी करणे आवश्यक, एका दिवसात संपूर्ण आकडेवारीसह कागदपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सामाजिक कार्यक्रते अनिल वाडपल्लीवर यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने MSRDC ला सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com