Onion Issue : नाफेडच्या व्हायरल यादीतून कांदा घोटाळा उघडकीस? पाहा VIDEO
मुंबई : नाफेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहेत. दरम्यान आता नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झालीय. या यादीतील माहिती बनावट असल्याची माहिती समोर येतेय. तर या यादीतील माहिती खोटी असल्याचा दावा शेतकरी आणि संबंधित कंपन्यांकडून केला जातोय. यासंदर्भात नाफेडच्या संचालकांची महत्वाची बैठक आज होणार आहे. नाफेड कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
गेल्या तीन वर्षांपासून कांदा खरेदीत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय. कांदा खरेदीची सोशल मीडियावर व्हायरल झालेली यादी नाफेडची असल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल ६ हजार शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीची यादी असल्याचं सांगितलं जातंय. व्हायरल यादीमध्ये यावर्षीच्या १८ मे ते २० जुलै पर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती आहे. यादीतील घोळांवरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. व्हायरल यादीतून कांदा खरेदीतील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.