Video: मविआकडून निषेध आंदोलन सुरू, Sharad Pawar काय म्हणाले?
आज पुण्यात मविआच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार भरपावसात या आंदोलनात सहभागी झाले होते. "अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे. राज्यकर्त्यांना जाण राहीलेली नाही. या घटनेवर त्यांना कारवाई करायची आहे. महाराष्ट्रात एक दिवस असा जात नाही, ज्यात कुठे तरी भगिनीवर अत्याचार झाल्याची बातमी येत नाही. आता पर्यंत जे घडले आहे त्याची सरकारने गांभिर्याने दखल घेतली पाहीजे. मला एका गोष्टीचे वाईट वाटते, राज्यकर्ते म्हणतात विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत. राज्यकर्ते किती अंसवेदनशील आहे हे यातून दिसते", असं शरद पवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.