गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विधानभवन आणि संसद सभागृहात सध्या गदारोळ सुरू असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीच्यावतीने संविधान चौकात आंदोलन केल्यानंतर विधिमंडळापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर या विरोधात भाजप कारवाई करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच अमित शहा यांनी माफी मागितली तरी त्यांची मानसिकता बदलणार आहे का? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या विरोधात देशात चिड निर्माण झाली असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर आज निषेध मोर्चा काढला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे देखील निळे कपडे घालून पोहोचले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.