Pune News: पुणे मेट्रोचं राजकारण तापलं; मविआचं भर पावसात आंदोलन

Pune Metro News : महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शिवाजी नगर परिसरातील सिव्हिल कोर्ट येथे आंदोलन करत मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी पुणे दौरा होता. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करणार होते. पण पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी सकाळी शिवाजी नगर परिसरातील सिव्हिल कोर्ट येथे आंदोलन करत मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने वाद झाला आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली बघायला मिळाली.

या मार्गाचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. पण मुसळधार पाऊस व चिखलामुळे मोदींचा हा दौरा अचानक रद्द झाला व हे उद्घाटन लांबणीवर पडले. त्यामुळे प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी महाविकास आघाडीने हे उद्घाटन आज तातडीने करण्याची मागणी केली आहे. यावेळी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही आंदोलकांनी मेट्रो स्थानकात जाण्याचा हट्ट धरल्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने या मेट्रोचे उद्घाटन करतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com