गद्दारांना ५० खोके, शेतकऱ्यांना ८५ रुपये? मुस्लिम शिवसैनिकाचा दसरा मेळाव्यात घणाघात, VIDEO

Muslim ShivSainik Slams Govt: उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आलेल्या मुस्लिम शिवसैनिकाने हल्लाबोल चढवला आहे. गद्दारांना 50 खोके, पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत असा सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क इथे होतोय. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का ? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबई येथे यायला सुरुवात झाली आहे.

आजच्या दसरा मेळाव्यासाठी मुस्लिम मावळा हा संगमनेरवरून शिवतीर्थावर दाखल झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी. आमचं मत चोरीला गेला आहे. शेतकऱ्यांना 85 रुपये गुंठा मदत मिळणार आहे. या सर्वांचा निषेध या मुस्लिम मावळ्याने केलाय. मुख्यमंत्री यांनी 25 लाखाचा बेड घेतला असला तरी 25 रुपये शेतकऱ्याला दिले असते तर बरं वाटलं असतं. अशी जोरदार टीका या शिवसैनिकाने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com