VIDEO : ट्रॅफिक पोलिसांच्या वाहनावरूनच हिंदीत सूचना; महिलेचा संताप, मराठीसाठी धरला आग्रह

Mumbai Woman viral Video : मुंबईसह महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा पेटला असून, मनसे आक्रमक झाली आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या वाहनावरूनच हिंदीत सूचना देण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला. त्यावर महिला अधिक आक्रमक झाली आणि तिनं मराठीचा आग्रह धरला.

संजय गडदे, मुंबई

मराठी भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र यानंतरही वारंवार मराठी ऐवजी हिंदी भाषेचा वापर सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी ऐवजी हिंदी भाषा वापरण्याला प्राधान्य दिल्यानंतर वादाचे अनेक प्रसंग घडल्याचे दिसून आले. मात्र आता चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीवर सूचनाच हिंदीतून दिल्या जात असल्याचा प्रकार मुंबईच्या गोरेगाव पूर्व परिसरामध्ये घडला असल्याचे समोर आले आहे.

गाडीवर मराठीऐवजी हिंदीतून सूचना देत असताना वाहतूक पोलिसाला एका जागरूक महिलेने मराठी भाषा वापरण्याविषयी सूचना केली. मात्र कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून महिलेला योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे महिला अधिकच आक्रमक झाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. शिवाय गाडी टो करणारे कर्मचारी देखील मराठीऐवजी परप्रांतीयच असल्याने महिलेने नाराजी व्यक्त करत मराठी भाषेची गळचेपी थांबवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com