Pod Taxi : काय सांगता ! लंडन, दुबईसारखी पॉड टॅक्सी मुंबईत येणार, VIDEO
परदेशात, दुबई - सिंगापूरला फिरायला गेल्यावर तिथे दिसलेली पॉड टॅक्सी आता लवकरच मुंबईत (Mumbai Pod Taxi) सुरू होणार असून वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान बीकेसी परिसरात या टॅक्सीची सुरुवात करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रकल्प पीपीपी मॉडेलवर सरकारी आणि खाजगी भागीदारीतून सुरु करण्यास आज मंत्रालयात झालेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंजुरी दिली आहे.
कसा असेल मार्ग?
या मार्गाचे अंतर 8.80 किमी एवढे आहे. त्यामध्ये एकूण 38 स्थानके असणार आहेत. पॉड टॅक्सीची क्षमता प्रति पॉड सहा प्रवासी अशी असणार आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा पॉड टॅक्सीचा वेग असणार आहे. या योजनेमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांची अरेरावी आणि दादागिरीतून सामान्य प्रवाशांची सुटका होणार आहे. बीकेसीतील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटणार असून, प्रवाशांचाही वेळ वाचणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.