Mumbai Metro : मुंबईत मेट्रोचं काम सुरू असताना अपघात, पाहा VIDEO

Girgaon Metro Accident : गिरगावात मेट्रोचं काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

मुंबईतील गिरगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना अपघात झाला आहे. ठाकूरद्वार येथे पायडिंग करणारी मशीन (क्रेन टाइप) कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

गिरगावमध्ये मेट्रोचे काम सुरू असतानाच ही घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला. ठाकूरद्वार येथे पायडिंग करणारी मशीन खाली कोसळली. एका दुसऱ्या मशीनमध्ये ती अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाले नाही, असे सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com