Mumbai Rain News : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात, सकाळपासून होते ढगाळ वातावरण

मुंबईच्या उपनगरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.

मुंबईत पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. पश्चिम उपनगरात गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरातल्या वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली आणि बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची चिन्ह होती. अशातच वीस ते पंचवीस मिनिटांपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com