ST Scam : एसटीमध्ये २ हजार कोटींचा घोटाळा? मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; काय आहे प्रकरण, पाहा Video

2000 Crore ST Scam : राज्य परिवहन मंडळात २ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीमध्ये २ हजार कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने १ हजार ३१० बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय सरकारला अंधारात ठेऊन घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महामंडळाने कंत्राटदारावर खास मेहरबानी दाखवली असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे एसटीला २ हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महामंडळाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तर परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

२०२२मध्ये ४४ रुपये प्रति किमी दराने ५०० गाड्या भाडेतत्वावर देण्यात आल्या होत्या. निविदेत डिझेल खर्च वगळून ३९ ते ४१ रुपये प्रति किमी दर ठरवण्यात आला. डिझेल खर्च प्रति किमी २० ते ३० रुपये असल्याने एसटीवर भार आला. मागच्या निविदेच्या तुलनेत प्रति किमी १२ रुपये अधिक भार येत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com