MPSC Exam News । 2025 पासून MPSC परीक्षा पद्धतीत बदल, वर्णनात्मक पद्धतीने लिहावी लागणार उत्तरं

MPSC परीक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता MPSC परीक्षेत वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा होणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता परीक्षार्थींना वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्वी परीक्षार्थींना योग्य उत्तर निवडण्याचा पर्याय होता. २०२५ पासून MPSC ची नवीन पद्धत सुरू होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. जून २०२२ मध्ये एमपीएससीने अभ्यासाद बदल करण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार होती. पण एका वर्षात एवढे मोठे बदल केल्याने विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे हे बदल २०२५ पासून लागू होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com