Ratan Tata : शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी वाहिली रतन टाटांना श्रद्धांजली
वयाच्या 86व्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर आता त्यांचे पार्थिव आज अंतिमदर्शनासाठी एनसीपीएच्या लॉनमध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना सुळे यांनी, ''टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माझे सासरे भालचंद्र सुळे आणि रतन टाटा यांनी अनेक संस्थांवर एकत्र काम केलं आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते. टाटा कुटुंबाच्या दु:खात पावर आणि सुळे कुटुंब सहभागी आहे.'' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.