VIDEO : ''पिक्चर अभी बाकी है''; पाटलांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : त्यांचा पक्ष प्रवेश हा शुभ शकुन आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार यांच्या गटातील प्रवेशावर दिली आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. पटलांचं मविआत येणं शुभ शकुन आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर अजित पवार यांच्या पक्षाचा दावा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कार्यकर्त्यांसह त्यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ''हर्षवर्धन पाटील यांचं महाविकास आघाडीत प्रवेश करणं हे आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकुन आहे. ये तो बस झाकी है, पिक्चर अभी बाकी है'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी '' ही काही नवीन बातमी नाही, मला जुनीच बातमी का सांगत आहात तुम्ही '' असं म्हणत यावर बोलण टाळलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com