Sanjay Raut : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बजेट तयार केलं आहे; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा | VIDEO

Sanjay Raut On Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प काल जाहीर झाला असून आज खासदार संजय राऊत यांनी त्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केवळ निवडणुका समोर ठेऊन हे बजेट तयार केल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

बिहारच्या तुलनेत महाराष्ट्र सारख्या राज्याला काय मिळालं? मोदींचं प्रत्येक बजेट हे राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं. भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे बजेटमध्ये बिहारवरती वर्षाव करण्यात आलेला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी केली आहे. काल मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. त्यावर त्यांनी ही टीका केली आहे. जिथे भारतीय जनता पक्षाचे राज्य नाही, मग तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तिथे तोंडाला पानं पुसायचे आणि पुढे जायचं आणि जे भाजपचे लोक आहेत अंध भक्त ते टाळ वाजवत असतात, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकांनी नाचावं असं काही नाही. हे बीजेपीचेच अंधभक्त उड्या मारत आहेत. आता त्याच्यावरती प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलं आहे. हे माध्यम वर्ग यांना खुश करणाऱ्या बजेट आहे. कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मत भाजपला पडलेली नाही. ईव्हीएम माध्यमातून मध्यमवर्ग यांची मदत तोडली त्याच्यामुळे मध्यमवर्गीय धक्यात आहे शॉक मध्ये आहे त्या मध्यमवर्गीयांना मधाचं बोट लावण्याचा हा प्रयत्न. प्रत्यक्षात या सगळ्या कागदावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळत आहे काय मिळणार आहे त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आता फक्त जे अर्थतज्ञ आहेत त्यांची भाषण ऐकायची आहेत त्यांनी केलेला विश्लेषण वाचायचा आहे प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

या महाराष्ट्रातल्या दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेले नाही. बजेट कळण्यासाठी किमान 72 तास जावे लागतात हा आमचा अनुभव आहे. देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणावर जाऊन पार्लमेंट चालत नाही. बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान 72 तास द्यावे लागतात. आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी पालखी वाला यांचे भाषण ऐकायला जावं लागत होतं. नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा पालखी वाले अर्थतज्ञ होते ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर मोठ्या मैदानात आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोक जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला बजेट कळायचं. हे काय चिंतामणराव देशमुख आहेत का सगळे का रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com