Sanajy Raut : सगळे धागेदोरे गुजरातमधूनच, राज्यात कायद्याची 'कुव्यवस्था'; राऊतांचा हल्लाबोल
सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. कधी कुठून गोळी चालेल, कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई आणि पुण्यात याचा भरोसा नाही. या सगळ्या गुंडाचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, मुख्यमंत्री शिंदे एकेकाळी म्हणाले होते ना, की मुंबईत लॉरेन्स बिश्नोई वगैरे गँग चालणार नाही, मी बघून घेईन, मग आता बघून घ्या ना, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रकरण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यासारखे आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचे सगळे सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला गोळ्या घालण्यात आल्या, कारण शिंदे सरकारला पब्लिसीटी हवी होती. आता बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्यांना गोळ्या घाला, असंही त्यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.