Kangana Ranaut : कंगना यांना ४ वर्षात १२ कोटींचा नफा !
भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी वांद्रे पाली हिलमधील आपल्या मालकीचे रो हाऊस विकले आहे. राणौत यांनी ही रो हाऊस ३२ कोटी रुपयांना विकल्याची माहिती आहे. 30७५ स्क्वेअर फुटचं हे प्रशस्त रो हाऊस कंगणा यांनी २०१७ मध्ये २० कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
पाली हिल परिसरात अनेक बॉलीवूड स्टार्स राहतात. अभिनेत्री राणौत यांनी हे रो हाऊस का विकलं याचं कारण अद्याप समजलेलं नाही. त्यांच्या या रो हाऊसमध्ये श्वेता बथीजा आणि कमलिनी होल्डींगची भागीदारी आहे.
चार वर्षांपूर्वी बेकायदेशीर फेरबदल आणि बांधकाम असल्याने पालिकेनं या रो हाऊसवर कारवाई करून काही भाग पडला होता. त्यानंतर आता ५ सप्टेंबर २०२४ रोजी कंगना राणौत यांनी या बंगल्याच्या व्यवहाराची नोंदणी केली होती. यासाठी त्यांनी १.९२ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरला असून ३० हजार रुपये नोंदणीसाठी भरले आहेत. हे रो हाऊस विकल्याने कंगना यांना १२ कोटींचा नफा झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.