Amol Kolhe News : ''पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब नाही.. ''; अमोल कोल्हेंचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar And Amol Kolhe : अजित पवार यांनी ''आता आपणच साहेब आहोत.'' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर ''एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही.''असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

''महाराष्ट्रात साहेब दोनच आहेत, एक शरदचंद्र पवार आणि दुसरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाच आमची पिढी साहेब मानते. त्यामुळे एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही.'' अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. अजित पवार यांनी ''आता आपणच साहेब आहोत.'' असं वक्तव्य केलं होत. त्यावर कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड आळंदी येथील एक कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना लालदिव्याची गाडी देण्याचं आश्वासन दिलं होत. आता आपणच साहेब असल्याची टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली. त्यावर शुक्रवारी खासदार अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत. एक शरद पवार आणि सुदरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमची पिढी यांनाच साहेब मानते. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही. यासाठी दुसऱ्याच्या नव्हे तर स्वत:च्या कर्तुत्वावर उभं राहणं असेल, किंवा संकटं आल्यावर पळून न् जाता संकटाला छातीवर झेलण म्हणजे पवारसाहेब असणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांना सांगायला नको.'' अशी खोचक टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com