Satpura Hills: सातपुड्याचं नैसर्गिक सौंदर्य खुललं, मनमोहक दृश्य पाहण्यासाठी डोंगररांगांमध्ये लोकांची गर्दी|VIDEO

Best monsoon waterfalls: पावसामुळे डोंगरमाथ्यांवरील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली असून वर्षा पर्यटनासाठी हे ठिकाण आकर्षण बनले आहे.

सध्या राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. उन्हाळ्या दरम्यान डोंगर दरीमध्ये असलेली झाडी, झुडपी ही नाहीशी झाली होती. मात्र सततची संततधार सुरू असल्याने निसर्गाचे सौंदर्य दाटून आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पावसामुळे सातपुड्याचे नैसर्गिक सौंदर्य खुललं असून सातपुड्यातील अनेक लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे. त्यातीलच एक तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वाल्हेरी धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत पसरलेले धबधबे आणि वर्षा पर्यटनाचा आनंदासाठी महाराष्ट्र गुजरात यासह मध्य प्रदेश राज्यातील पर्यटक सध्या सातपुड्यात दाखल होत आहेत. रविवारच्या सुट्टी असल्या कारणाने वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com