Maharashtra Politics : मनसेचा नेता अजित पवार यांच्या भेटीला; चर्चेला उधाण, पण नेमकं कारण काय? VIDEO

Bala Nandgaonkar meets Ajit Pawar : बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्या भेटीनं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जुंपली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. मात्र, या भेटीवर स्वतः नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट राजकीय कारणास्तव झालेली नाही, असं ते म्हणाले.

मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवारांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. सुरुवातीला या भेटीचं कारण स्पष्ट झालेलं नव्हतं. पण राज ठाकरेंच्या टीकेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि मनसेमध्ये जबरदस्त जुंपली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींवरही जोरदार हल्लाबोल केला होता. हे कारण या भेटीमागचं असू शकतं, असा कयास राजकीय वर्तुळात लावला जात होता. त्यामुळं या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं.

पण स्वतः नांदगावकर यांनीच या भेटीवर स्पष्टीकरण दिलं. ही भेट कोणत्याही राजकीय कारणानं झाली नाही. पंढरपूरमधील एका विकासकामाच्या अनुषंगानं ही भेट होती. तेथील मनसेचे स्थानिक नेतेही सोबत होते, असं नांदगावकर म्हणाले. यावेळी त्यांनी मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावरही भाष्य केले. राजकारणात क्षुल्लक गोष्टी होत असतात. काही गोष्टी इकडे-तिकडे होत असतात, असंही सांगितले. याशिवाय टोल वाढला तर आंदोलन होईलच, असा इशाराही दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com