Video: मनसे आणि रविकांत तुपकर एकत्र येणार?
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमालाचे भाव वाढवा, पीक विमा यासाठी आमचे वर्षा बंगल्यावर आंदोलन होते. मात्र, सरकारने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप रविकांत तुपकर यांनी केलाय. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा पण तुपकरांनी दिलाय. सहकाऱ्यांची इच्छा आहे की , मी दोन मतदार संघातून लढावं. जनमताची सुद्धा भावना आहे की तुपकर यांनी निवडणूक लढवावी. सत्ताधारी माझ्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न करतायेत. सहकारी कुठेही जाणार नाहीत. आम्ही थांबणार नसून आता लढत राहणार असंही तुपकर थेटच बोललेत. "मध्यंतरी काही मनसेचे नेते मंडळी मला भेटली. एकत्र येण्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुढील चर्चा काही अद्याप झाली नाही. राज ठाकरे आणि माझी भेट अशात झाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेट झाली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची भेट झाली नाही" असं रविकांत तुपकर म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.