Amol Mitkari News: काय म्हणतायत अमोल मिटकरी? शरद पवार गटाचे 2 आमदार फुटणार?

शरद पवार गटाकडून दावा केला जातोय की अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांचेच २ आमदार सध्या देवगिरी बंगल्यावर बसून आहेत. काय म्हणाले अमोल मिटकरी...?

Amol Mitkari News: काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. राजकारणात अशा चर्चा फार काही नव्या नाहीत पण विधानसभेच्या निवडणुका जवळ येतायत त्यामुळे याविषयी आता आणखीनच चर्चा होतायत. शरद पवार गटाकडून दावा केला जातोय की अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर येताना दिसतायत. यावर आता अमोल मिटकरींची प्रतिक्रिया येतीये. खरंतर शरद पवार गटाचेच २ आमदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत. त्यांचेच २ आमदार सध्या देवगिरी बंगल्यावर बसून आहेत. ते आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी का गेलेत ? याचा शोध विरोधी पक्षाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com