Video: गौतमीसोबत थिरकले आमदार संदीप धुर्वे

आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती.

मिशिवाल्या आमदाराला सबसे कातील गौतमी पाटील सोबत नाचण्याचा मोह आवरला नाही. यवतमाळच्या उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंडी महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला. यात आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णीचे भाजप आमदार डॉ संदीप धुर्वे ह्यांनी तुफान डान्स करून धम्माल केली. आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com