Ajit Pawar : अजित पवार यांनी लावली पैंज; केलं मोठं वक्तव्य | Politics

Sinnar Assembly constituency : सिन्नर विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल अजित पवार यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत पैंज लावली आहे.

अजितदादा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून लढल्यास दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून देऊ अशा शब्दात माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना सिन्नरमधून लढण्याची ओफर दिली आहे. मात्र सिन्नरमधून माणिकराव कोकाटेच लढणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट करत, कोकाटे जास्त मतांनी निवडून येतात की बारामतीचा आमदार यावर अजितदादांनी पैंजच लावली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या या पैंजेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी एका सभेत अजित पवार यांनी सिन्नरमधून निवडणूक लढवली तर त्यांना दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून देऊ असं म्हंटल आहे. यातलं एक मत जरी कमी झालं तर मी मुंबईच्या मंत्रालायची कधीच पायरी चढणार नाही असं देखील यावेळी कोकाटे यांनी म्हंटलं आहे. यावर उत्तर देताना अजितदादांनी मात्र चक्क पैंजच लावली आहे. सिन्नरमधून आमदार माणिकराव कोकाटे हेच पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे आणि माणिकराव कोकाटे अधिक मतांनी विजयी होतात की बारामतीचा आमदार हे पाहू, अशी पैंजच त्यांनी यावेळी लावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com