अजित पवारांच्या आमदाराने 4 वर्षीय चिमूकलीला उडवले, पाहा अपघाताचा थरारक|VIDEO

Ajit Pawar Camp MLA Vehicle: शिरूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीचा अपघात झाला असून चार वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. मुलीची प्रकृती स्थिर असून वडिलांनी गाडीचालकाचा दोष नसल्याचे सांगितले.

शिरूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक चार वर्षांची मुलगी जखमी झाली असून तिच्यावर केएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाडीवाल्याचा दोष नसून माऊली आबांनी मदत केली, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार टीव्ही कलाकार आहेत आणि आमदार व्हिलन आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर राजकारणाचा आरोप केला आहे. मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली. रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडे मळा परिसरात हा अपघात झाला आहे. निवडणुकीच्या प्रचाराला जात असताना हा अपघात झाला असून सध्या त्या मुलीची प्रकृती स्थिर आहे असे तिच्या वडिलांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com