MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

MIM ने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मेल करून प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर महाविकास आघाडी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे लेखी प्रस्ताव दिलेला आहे. मेल आणि व्हाट्सअपद्वारे दिलेला आहे. मात्र जागा संदर्भातली कुठलीही मागणी केली नाही. २७ जागा हे कुठून आलं हाही मला प्रश्न पडला आहे, असं जलील म्हणालेत. शिवसेना आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला सोबत यावं, यासाठीचा माझा प्रयत्न असल्याचाही जलील यांनी सांगितले. एमआयएम मुंबई आणि ठाण्यात सर्वाधित जागा मागितल्या आहेत. जलील यांच्या प्रस्तावानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com