Special Report: लिफ्टमध्ये लिहिलं गेलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय.

राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्यामुळेच कुठे-कशी-आणि कुणासोबत निवडणुकीच्या राजकारणाची काय खिचडी शिजेल ते सांगता येत नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आणि त्यांची सर्वातआधी भेट झाली ती त्यांचे कट्टर राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीसांसोबत....दोघेही लिफ्टच्या बाहेर भेटले आणि सोबतच लिफ्टमधून सभागृहात गेले. मात्र या लिफ्टमध्येच विधानपरिषद निवडणुकीची स्क्रीप्ट लिहिली गेल्याची चर्चा आता विधानभवन परिसरात सुरू झालीय. कारण या भेटीचा दुसरा अंकही विधानभवनात रंगलाय....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com