Jalna News: जालना शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध;महिलांवर पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Protest against eviction drive in Post Office area Jalna: जालना शहरात अतिक्रमण हटवताना महिलांनी केलेल्या विरोधामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत पाच महिलांना ताब्यात घेतलं.

जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील पिवळा बंगला भागामध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान पोलिसांचा स्थानिक महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. मात्र कारवाईच्या विरोधात स्थानिक महिलांनी प्रतिकार करत जमाव जमवला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत पाच ते सहा महिलांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईदरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com