Wankhede Stadium Stand Named Sharad Pawar: ज्येष्ठ राजकारणी आणि क्रिकेट प्रशासक शरद पवार यांचे नाव वानखेडे स्टेडियममधील एक स्टँड देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) हा निर्णय घेतला. ग्रँड स्टँड लेव्हल 3 आता "शरद पवार स्टँड" म्हणून ओळखले जाणार आहे. भारतीय क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानामुळे त्यांचा सन्मानार्थ स्टँडला नाव देण्यात आलेय.
शरद पवार यांनी 2001 ते 2013 आणि पुन्हा 2016 पर्यंत MCA चे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई क्रिकेटचे आधुनिकीकरण केले आणि वानखेडे स्टेडियमच्या नूतनीकरणाचे नेतृत्व केले. त्याच स्टेडियममध्ये 2011 च्या ICC क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. पवार यांनी BCCI आणि ICC चे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांच्या नावाने ठेवलेल्या स्टँड्ससह नव्याने नामकरण केलेल्या स्टँड्सचे उद्घाटन 16 मे 2025 रोजी होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर उपस्थित राहतील. हा सन्मान MCA च्या मुंबईच्या क्रिकेट वारशात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.