Pandharpur VIDEO: टोपलीत छत्रपती शिवाजी महाराज अन् मुखी विठु नामाचा गजर, माऊलीचा मध्यप्रदेशहून वारीत सहभाग
पंढरपुरात अनेक वारकरी हे वारीसाठी येत असतात. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील लोकांनाही पंढरपूर वारीचं आकर्षण असतं. अशातच कमल शर्मा या मध्य प्रदेश वरून वारीसाठी दाखल झाल्या आहेत. त्या दरवर्षी आषाढी वारीच्या दिंडीत सहभागी होतात. त्यांची टोकरी ही वारीतील आकर्षणाचा विषय बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, विठु माऊली, संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा आणि एका डॉलरवर सत्यमेव जयते असं लिहून कमल शर्मा यांनी अनोखी टोपली तयार केली आहे. नवीन सूनबाई आल्यापासून आम्ही दोघांनी मिळून हे बनवलं असल्याचं त्या म्हणाल्या. सर्व एक असून, माऊली म्हणून सर्वांना उच्चारलं जातं, मी तूचा भेदभाव नसतो असा संदेश त्यांनी वारीतून दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.