Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक; अंगावर बुक्का फेकला, VIDEO

Gunratna Sadawarte News : मराठा समजा पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. या मुद्द्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.
गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक; अंगावर बुक्का फेकला, VIDEO
gunaratna sadavarteSaam tv
Published On

धाराशिव : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. धाराशिवातील तुळजाभवानी मंदिराच्या आवारात ही घटना घडली.

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. धाराशिवातील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना मराठा आंदोलकांचा सामना करावा लागला. ते एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीसाठी आले आहेत. यासहित आज बुधवारी गुणरत्न सदावर्ते हे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी मंदिराच्या आवारात गुणरत्न सदावर्ते येताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तसेच यावेळी आंदोलकांनी त्यांच्या अंगावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. वकील गुणरत्न सदावर्ते सतत मराठा समाजाविषयी बेलात वक्तव्य करत असल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com